सुश्री संगीता कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ तो असा असावा… ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆
☆
मी नाही भेटली दिवसभर
तर त्याने खूप बैचेन व्हावं
*
संध्याकाळी ऑफिसबाहेर
भेटून सरप्राईज द्याव
*
भेटण्यासाठी ठरलेल्या जागी
त्याने माझ्या आधी यावं
*
उशीरा आले म्हणून
लटके लटकॆ रागवावं
*
फिरताना जर नजरेआड झाली
तर त्याने कावरबावरं व्हावं
*
दिसल्यावर मात्रं
अश्रू लपवत प्रेमानं ओरडावं
*
माझं काही चुकलं तर
त्याने कधी ही न रागवावं
*
अबोला धरुन न रडवता
काय चुकलं ते समजवावं
*
ज्याची कल्पना केली इतकी
भर-भरुन प्रेम देणारा तोच असावा
*
माझी आठवण आली त्याला की
त्यानं माझ्यासाठी एक कविता लिहावी
☆
© सुश्री संगीता कुलकर्णी
लेखिका /कवयित्री
ठाणे
9870451020
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈