प्रा. सौ. सुमती पवार
कवितेचा उत्सव
☆ तिच्या मानसी मी… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆
☆
दुरावा तिचा हा जरा साहतो ना
तिच्या मानसी मी सदा राहतो….
*
तिचे राज्य माझे मनावरती हो
तरी तेच सारे प्रेमाने वाहतो मी
कसे रूप तिचे सावळे आभाळ ते
आभाळाशी जणू आहे माझे नाते…
अशा त्या तिला मी मनी पाहतो
तिच्या मानसी मी सदा राहतो…
*
कशी चाफेकळी सावळीशी छान
बटा ओघळती वेळावते मान
विना शृंगार ती दिसे मेनका हो
मन मोर नाचे केतकी बनी हो
तिची मूर्त अशी हृदी जपता
तिच्या मानसी मी सदा राहतो…
*
तिचा ध्यास माझ्या मिटे पापण्यात
तिला पाहतो मी रात्री चांदण्यात
धुके होऊनी ती लपेटून घेते
अलगद ओठ पहा टेकवते
तिच्या ह्या अदा नि रूपसंपदात
कळेना मला हो स्वप्नी की सत्यात….
☆
© प्रा.सौ.सुमती पवार
नाशिक
मो. ९७६३६०५६४२; ईमेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈