सुश्री प्राची जोशी
कवितेचा उत्सव
☆ फेरे प्रारब्धाचे… ☆ सुश्री प्राची जोशी ☆
☆
निळ्या आसमंती झाली ढगांची दाटी
काळ्याभोर ढगांतूनी सूर्यकिरणे डोकावती – –
*
ढगांनी व्यापलेले हे काळेभोर आकाश
मनावरील मळभ खोलवर उदास – –
*
ढगांतूनी डोकावतो निळा निळा प्रकाश
जणू तो दाखवितो प्रकाशाची वाट – –
*
काळे ढग उन्मळूनी घनघोर बरसती
त्या पावसातल्या उन्हातूनी इंद्रधनुष्य डोकावती – –
*
सप्तरंगी इंद्रधनुष्याची अती तेजस्वी किरणे
पाहताना दिसे मज शिवधनुष्य पेलले रामाने – –
*
निसर्गाच्या लीलांवर असे प्रभुत्व परमेश्वराचे
मानवाच्या हाती उरे खेळ पाहणे किमयांचे – –
*
परमेशाच्या लीला असती अगाध
मानवाच्या बुध्दीला नसे तिथे वाव – –
*
हात धरी रामराया असा अलगद आपला
परमार्थाच्या भवसागरी पार करी प्रपंचनौका – –
*
सागरात दिसे रामनौका अशी दूरवर जाताना
जाणवे खोल मनात रामलक्ष्मण सीतेची व्यथा – –
*
वाटे असे…..
जिथे देव भोगी वनवास तिथे मानवाचे काय
प्रारब्धाचे न चुकले फेरे कुणा मानवा सात जन्मात – –
☆
© सुश्री प्राची अभय जोशी
मो ९८२२०६५६६६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈