श्रीमती मीनाक्षी सरदेसाई
☆ कवितेचा उत्सव ☆ जन्म…. ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆
(निसर्ग विज्ञान कविता)
वाऱ्याने जेव्हां
टरफल उघडलं
‘बी’ला दिसलं
आभाळ निळं
बाहेरचं जग
सुंदर इतकं.-
‘बी’ने कधी
पाहिलंच नव्हतं.
मातीने प्रेमाने
कुशीत घेतलं
उन्हाने उबदार
पांघरुण घातलं
चिमुकल्या ओठानी
पाणी पिऊन
‘बी’बाळ चटकन
झोपी गेलं
दुसरे दिवशी
जाग आली
तेव्हां शेपटी
फुटलेली
तिसरे दिवशी
जादूने
शेपटीचीच
मान झाली
उगवलं झाड,
झालं उंच
कोणी म्हणालं
‘ही तर चिंच ‘
फांदीच्या टोकाला
उगवला चिंचेचा आकडा
वाटोळा
चिमुकल्या ‘बी’ची
झाली होती आई
ती नव्या बाळाला
जन्म देई
श्रीमती मीनाक्षी सरदेसाई
मो. – 8806955070
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈