☆ कवितेचा उत्सव ☆ प्रेमात पडता ☆ मेहबूब जमादार ☆
बनांत हिरव्या भान हरपले मज कळले नाही
मी सामावले तुझ्यात केंव्हा मज कळले नाही
ब-याच दिवसांत होते कांहीसे नुसते पहाणे
जवळ येवूनी कधी बोलले मज कळले नाही
रात दिस तू माझ्या नयनी ऊठता बसता
भाव सारे नयनांत दाटले मज कळले नाही
प्रेमाच्या वाटा असती खडतर जाणूनी होते
त्या वाटेवर कधी प्रेम लाभले मज कळले नाही
प्रेमात पडता खरे फुलून जाते अवघे जीवन
ह्रदयात तूझ्या मी रूजून गेले मज कळले नाही
© मेहबूब जमादार
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
वाकई भाई प्यार में ऐसा ही होता है