सौ. वंदना अशोक हुळबत्ते
☆ कवितेचा उत्सव ☆ कोंडमारा ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆
यशाचं शिखर
परदेशात प्राप्त केलस
तिथं आपलं अस्तित्व दाखवलस
फोनवरून बोलतोस
नेटवरून भेटतोस
याने तुझ्या आईचे
समाधान होत नाही
मनातली अस्वस्थता
कोणाला ही दाखवत नाही
उगीचच घरातून
सैरावैरा धावते
तुझ्या आठवणीने
डोळ्यात पाणी येते
येणाऱ्या जाणाऱ्या ना
तुझ्या खोड्या सांगते
मोडक्या तोडक्या
खेळण्यात तुझे
बालपण शोधते
माझ्यांने तिचे हाल
पाहावत नाहीत
तिला धीर देण्याची
माझ्यात हिंमत नाही
एकदा तू येवून जा
तिच्या मायेला
पूर येवू दे
मनाचा कोंडमारा
रिता होवू दे
मनाचा कोंडमारा
रिता होवू दे
© सौ.वंदना अशोक हुळबत्ते
मो.९६५७४९०८९२
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈