☆ कवितेचा उत्सव ☆ बंद खोलीमध्ये ☆ श्री शरद कुलकर्णी ☆ 

बंद खोलीमध्ये,

एकांताचा बोधिवृक्ष असतो.

त्याच्या छायेखाली,

बरच कांही समजून घ्यायच असतं

 

बंद खोलीमध्ये,

एक समजूतदार फडताळ असतं.

तिथं अस्ताव्यस्त आठवणी,

न पाठवलेली पत्रं,

अपूर्ण लिखाण व्यवस्थित

ठेवायचं असतं.

 

बंद खोलीमध्ये,

खिडकीतून येणार्‍या कवडशातून, मनातला अंधार

समजून घ्यायचा असतो.

 

बंद खोलीमध्ये,

एक गूढ गुहा असते.

त्यातल्या हिंस्र जनावराला-

करुणेन समजून घ्यायचं असत.

 

बंद खोलीमध्ये,

स्तत:ला स्वत:पासून,

बाहेरच्या जगापासून,

जाणीवपूर्व

विलग करायचंअसतं.

 

©  श्री शरद कुलकर्णी

मिरज

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
3 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments