श्री सुहास रघुनाथ पंडित
☆ कवितेचा उत्सव : ना बोललो तरीही – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
ना बोललो तरीही सांगून काय गेलो
ना बोलावताही जवळी कशास आलो.
अजाणतेपणीही किमया अशीच घडते
फासे असे सुखाचे पडणे उचित होते
ठरवून काय मन हे प्रेमात गुंतते का ?
ओथंबल्या घनाला कुणी थांबवू शके का ?
रिवाज रिती यांची झाली बहुत ख्याती
मार्गावरी जराशी पेरीत जाऊ प्रीती.
सुख सावलीत बांधू अपुले सुरेख घरटे
माझ्या तुझ्या मनीचे डोळ्यात स्वप्न दाटे.
© श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
Atisundar rachana
धन्यवाद