☆ कवितेचा उत्सव ☆ चिमण्या ☆ श्री प्रदीप कासुर्डे ☆ 

(20 मार्च जागतिक चिमणी दिवस निमित्ताने कविता)

आजी सांगायची गोष्ट

चिमणीचं घर मेणाचं

कावळ्याचं घर शेणाचं

चिऊताई चिउताई दार उघड

आज माझी आईं

माझ्या मुलीला  कोणती गोष्ट सांगेल ?

 

आई म्हणायची गाणं

एक घास चिउचा

एक घास काऊचा

आज माझी बायको

मुलीसाठी कोणतं गाणं म्हणेल ?

 

बहिणाबाईंच्या कवितेत

आम्ही वाचायचो

अरे खोप्यामधी खोपा

सुगरणीचा चांगला

देखा पिल्लासाठी तिने

झोका झाडाले टांगला

आज आमची मुलं

कोणत्या कविता वाचतील ?

 

आज कुठे आहेत चिमण्या

लेकींप्रमाणे माहेरी तर गेल्या नाहीत ना?

 

© कवी प्रदीप कासुर्डे

नवी मुंबई

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments