☆ कवितेचा उत्सव ☆ साफल्य वैफल्य ☆ श्री शरद कुलकर्णी ☆
साफल्य वैफल्य,
दोन्हींही सापेक्ष.
निरपेक्ष मन,
असो द्यावे.
असो द्यावे मन,
सावचित्त थोडे
अबलख घोडे,
एरव्ही हे.
एरव्हीचे जिणे,
जुनेच पुराणे.
ओठावर गाणे,
यावे पुन्हा.
यावे पुन्हा सारे,
परतून वारे
शैशवाचे तारे,
आकाशी या.
© श्री शरद कुलकर्णी
मिरज
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈