सौ. राही पंढरीनाथ लिमये
☆ कवितेचा उत्सव ☆ प्रिय सखी…. ☆ सौ. राही पंढरीनाथ लिमये ☆
“प्रिय सखी “
सांजवेळी बसले होते संचित
ती समोर आली अवचित.
सखी ला कसला विचार सतावतोय?
जगण्याचा अर्थ कुठे उमगतोय?
तो आजपर्यंत कोणाला उमगला?
व्यर्थ जोजार देऊ नको जीवाला.
परमेशाच्या हाती हिशोब जगण्याचा
आपण कठपुतली बाहुल्या संचिताच्या.
अश्रू पूस सावर स्वतःला
मी नेहमीच आहे सोबतीला.
तिने डोक्यावरून हात फिरवला
मनात भावनांचा कल्लोळ दाटला.
उचलली लेखणी भावनाना वाट दिली
झरझर कागदावर शब्दकला रेखाटली.
माझी सखी जगणं फुलवते
माझी सुंदर कविता मग सजते.
सौ. राही पंढरीनाथ लिमये
मो नं 9860499623
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈