श्री तुकाराम दादा पाटील

☆ कवितेचा उत्सव ☆ साधू ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆ 

कल्पतरूच्या छायेखाली दिसला साधू

देवपणाचे दान मागुनी फसला साधू

कफनी अंगी जटा बांधल्या डोईवरती

परंपरांचे खूळ माजवत बनला साधू

 

चिलीम छापी घेऊन हाती भरला गांजा

झुरक्यावरती मारीत झुरके गुतला  साधू

ध्यानधारणा करून खोटी मजा मारतो

देवासंगे मारत बाता‌ बसला साधू

 

भाळावरती  नाम ओढला वैराग्याचा

जग फसल्यावर मनात त्याच्या हसला साधू

गंडवण्याला समाजातले दुवे शोधले

माणसातल्या अर्धवटांवर टपला साधू

 

शृंगाराची नामी संधी आली तेव्हा

शिष्यामधल्या मासोळीतच रमला साधू

सत्व कोठले तत्व कोठले दिसले  नाही

ढोंग माजवत आयुष्यातून उठला साधू

 

थाटमाट तर भव्यपणाचा मठात त्याच्या

बडवत डंका चौमुलखावर  फिरला साधू

मंबाजीच्या जातकुळीची ब्याद निपजली

मग लोकांनी उखळा मध्ये कुटला साधू

 

©  श्री तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

image_printPrint
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments