? कवितेचा उत्सव ?
☆ ओळख स्वस्वरूपाची ☆ डॉ. पुष्पा तायडे ☆
जीवन खूप सुंदर आहे
आपणच आशा निराशेचा खेळ करतो
ईश्वराने मनुष्यासाठी जो संकल्प केला
तो कधीच त्याने नाही तोडला
संसारात राहून साधनेसाठी गुरूजींनी केला जो संघर्ष
त्यांचाच घेऊया आपण रोजरोज परामर्ष
घालवा रोज प्रत्येक क्षण आनंदात
ईश्वराने ठेवले आहे तुम्हाला सुखात
नका येऊ देवू मनात भाव असल्याचा दु:खी
सततच्या नामस्मरणानेच व्हाल तुम्ही सुखी
ईश्वरानेच घडवले हे तुमचे मानवी शरीर
पहा किती सुबक रेखाटल्या तळहातावरील लकीर
या विशाल सृष्टित र्इश्वराने बनविले तुम्हाला असाधारण
मग तुम्हीच स्वत:हून स्वत:ला का मानता साधारण
ओळखा स्वस्वरूपाला
मगच शांती मिळेल मनाला
© प्राचार्य डॉ. पुष्प तायडे
वर्धा
मो 9422119221.
≈ संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈