कवी राज शास्त्री
☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 42 ☆
☆ !! अभंग.. !! ☆
पॉझिटिव्ह शब्द, होता किती छान !!
लागले ग्रहण, तयासी हो…०१
कोरोना बिमारी, अजगर रुपी !!
गिळंकृत करी, सानं-थोरं …०२
नियम पाळावे, निरालंबी व्हावे!!
घरात बसावे, मुकाट्याने…०३
वासना सांडावी, प्रतीक्षा करावी !!
प्रार्थना म्हणावी, श्रीकृष्णाची…०४
देवा सर्वेश्वरा, राखावे आम्हाला !!
प्राण कंठा आला, योगेश्वरा…०५
साधावा आचार, स्मरण साधावे !!
निर्वेद म्हणावे, सदोदित…०६
करावा उदयम, सोडा प्रलोभन !!
अमोल जीवन, मानवाचे…०७
सुंदर प्रभात, उगवेल नक्की !!
खात्री मला पक्की, मनांतरी…०८
कवी राज म्हणे, देवाचेच होणे !!
इतुके सांगणे, पामराचे…०९
© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.
श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005
मोबाईल ~9405403117, ~8390345500
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈