सौ. अमृता देशपांडे
? कवितेचा उत्सव ?
☆ ग्रीष्माचा उष्मा ☆ सौ. अमृता देशपांडे ☆
सूर्याचा रथ रेंगाळे आकाशी
सृष्टीच्या अंगाची लाही लाही
तापला मार्तंड, झाली अस्वस्थ ही मही
ग्रीष्माचा उष्मा सोसवेना
निळ्या आभाळी दिसती पुंजके पांढरे
एका थेंबासाठी धरा सोडिते सुस्कारे
पांढरे ते ढग केव्हा होतील जलद
ग्रीष्माचा उष्मा सोसवेना
तहानली धरा तहानली सृष्टी
आसुसली घेण्या पावसाची वृष्टी
पाखरे ही गप्प आपुल्या घरटी
ग्रीष्माचा उष्मा सोसवेना
तेव्हाच कळते मोल संपत्तीचे
जेव्हा वाटे रखरख रुक्ष वास्तवाचे
थेंब थेंब साठवावा जल संपदेचा
ग्रीष्माचा उष्मा सोसवेना
जीव तृप्त होती वर्षता वरूण
जाताना सांगती सूर्याचे किरण
सांभाळा मित्रांनो आकाशीचे देणे
नाहीतर भविष्य हे ग्रीष्माचा उष्मा
नाहीतर भविष्य हे ग्रीष्माचा उष्मा
© सौ अमृता देशपांडे
पर्वरी- गोवा
9822176170
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈