? कवितेचा उत्सव ?
☆ चारोळ्या ☆ श्री अनंत गाडगीळ ☆
(- अनंता.)
तुझे मोठे मोठे डोळे
अन् खळीदार हसू..
सांग तू मला आता
हे सारं मी कसं सोसू?
वस्तुस्थिती
मी तितका काही वाईट नाही
जितका की लोक सांगतात..
माझे नशीबच वाईट आहे अन्
बाकीची आग लोकं लावतात .
हाय रे हाय
एक तर विरहाचे दुःख आहे
आणि वर एकटेपणा छळतो
तू आता ये ना लवकर इकडे..
नाहीतर इथे माझा प्राण जातो!
बायको
मला समजले लग्नानंतर..
बायको म्हणजे असते काय?
ती तर संसाराचा सरव्यवस्थापक..
तिच्याशिवाय कुणाचे चालते काय?
कविता
कविता म्हणजे भावनांची संहिता
अंतर्मनातील विचारांची सुबकता
साच्यात बसवलेली आकर्षकता..
विचारप्रवण करणारी कलात्मकता!
वास्तव
किती समुद्र सामावलेत तिच्या डोळ्यांत…
जितकी वादळे दडलीत तिच्या मूकपणात!
जर तिच्या भाववादळांचा उल्लेख केलात
तर तिच्या डोळ्यांतून समुद्र वाहत येतात.!
वास्तव
परिस्थितीच प्रत्येक माणसाला
आपले प्यादे बनवत असते मात्र
काही माणसे वजीर असतात जी
परिस्थितीला बदलवत असतात!
— अनंता.
© श्री अनंत नारायण गाडगीळ
सांगली.
मो. 92712 96109.
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈