श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ विराणी ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆
काळा संगे सोबत करते
मुदीत मनाने आभाळ सारे
कधी बांधते पदरामध्ये
कधी मिरवते हातात तारे
जपण्यासाठी करायचीती
सर्व साधना करून झाली
चंद्रा सोबत एक चांदणी
ऐश्वर्याचे जगणे जगली
नव्हती तेव्हा कसली चिंता
परस्परांचा आधार होता
संसाराच्या पदरा मधला
गर्भ रेशमी नव्हता गुंता
तृप्त मनाने जगता जगता
निरोप घेणे जमेल नक्की
आठवताना भूतकाळ पण
मध्येच येते मनात हुक्की
आठवले की सारे आता
तनामनाची होते फसगत
दूर नभातील चंद्र अनावर
मिठीत येतो परतून अलगद
© श्री तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
सुंदर रचना