श्रीशैल चौगुले
कवितेचा उत्सव
☆ वि. दा. च्या स्मरणी……! ☆ श्रीशैल चौगुले ☆
चिरुन भिंती भेदून कारा
वचन सागरा धन्य मायभू.
अजून गर्जना वायूत लहरे
दिशात बहरे स्वातंत्र्यानांदे.
पूर्वेचा अलोक प्रभाती सांगतो
नितचा रंगतो पराक्रमी त्या.
इतिहास थोर कर्तव्या शौर्य
हिंदवीत धैर्य मृदाभक्तीत.
प्रसन्न रत्नाकर थरथरे जळ
विनायका बळ हिंद तीराशी.
शब्दांतून ऊमटे हृदयाची भाषा
घुमवीत दिशा सावरकर.
प्रार्थना सचित्ती भूमीत अखंड
पुरुषार्थी बंड भारतदेशा.
गौरवा अनंत क्षितीजा प्रणाम
लोचनात धाम अथांगप्राण.
© श्रीशैल चौगुले
९६७३०१२०९०
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈