कवी राज शास्त्री
☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 43 ☆
☆ !! अभंग.. !! ☆
जन्माचे सार्थक, आपुल्याच हाती !!
आठवावी स्मृती, पूर्वजांची…०१
स्मरण चिंतन, सतत करावे !!
बंधन पाळावे, सर्वपरी…०२
व्यर्थ बडबड, थांबवून द्यावी !!
तयारी करावी, भजनाची…०५
अन्यवार्ता जीवा, नकोच करणे !!
ओठासी घालणे, कुलूप हो…०६
मोजके बोलावे, सत्यच वदावे !!
मना आवरावे, पुन्हा-पुन्हा…०७
जीवन अमोल, खर्च होय पहा !!
नर्क आहे महा, मृत्यू पाठी…०८
म्हणोनी सांगणे, इतुके बोलणे !!
सत्कार्या कारणे, कार्य करा… ०९
कवी राज म्हणे, योग्य ज्ञान घ्यावे !!
बाकीचे सांडावे, कायमचे…१०
© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.
श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005
मोबाईल ~9405403117, ~8390345500
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈