श्री हेमंत मुसरीफ
कवितेचा उत्सव
☆ लस घ्या ..☆ श्री हेमंत मुसरीफ ☆
आजीआजोबा रांगेत
किती वेळ ते तिष्ठत
मिळणारं कधी लस
उभे राहिलेले कष्टत
किती केवढा रे साठा
का उत्तर ना मिळत
लसघेणारे अन् साठा
समीकरणे ना जुळत
घाई सकला लस देऊ
राहता कायम पळत
लस पुरता पुरेना बा
दळण राहतायं दळत
लस संपली बोर्ड लाव
बसावे कारणे टाळत
आम्ही मात्र सहन करे
मुळीचं नाही कंटाळत
तीचं ती धुणी धुवावी
लक्तरे घालावी वाळत
लाईनमध्ये उभे आम्ही
रे आशेने लाळ गाळत
गुळमुळीत तीचं उत्तरे
बसा निवांत उगाळीत
हात हलवी परत जाई
काहीचं नसते झोळीत
© श्री हेमंत मुसरीफ
पुणे
मो 9730306996
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈