सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? कवितेचा उत्सव ?

☆ स्वातंत्र्य दिनी स्मरण… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे☆

स्वातंत्र्याच्या वेदीवरती,

    किती आहुती पडल्या होत्या!

नाही त्यांची गणती काहीच,

   आज घडीला स्मरू या त्या!

 

आद्यजनक ते स्वातंत्र्याचे,

  लक्ष्मीबाई अन् तात्या टोपे!

त्यांचीच धुरा हाती घेती ,

  शूरवीर वासुदेव फडके!

 

टिळक आगरकर जगी  आले,

  स्वातंत्र्य सूर्याची आस घेऊनी!

गांधीजींचे आगमन झाले,

 सत्त्याची ती कास धरूनी!

 

स्वातंत्र्यनभी सावरकर तळपले,

 क्रांतीची ती मशाल घेऊनी !

भगत, राजगुरू सुखदेव गेले,

  फासावरती दान टाकुनी !

 

चौ-याहत्तर वर्षे स्वातंत्र्याची,

 कशी उलटली वेगाने !

घोडदौड देशाच्या प्रगतीची,

 मोदी चालविती नेटाने !

 

देशाची प्रगती सर्वांगीण,

  ध्येय हेच धरू या ऊरी!

शतकाची  वाटचाल ही,

  जगास दावू स्वप्ने खरी!

 

© सौ. उज्वला सहस्रबुद्धे

पुणे (महाराष्ट्र)

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments