श्री अमोल अनंत केळकर
☆ कवितेचा उत्सव ☆ श्रावण : विडंबन ☆
नेहमीचा श्रावण:-
सुख वेचिन म्हणण्या आधी
घन दुःखाचा गहिवरतो
अन दुःख सावरु जाता
कवडसा सुखाचा येतो
या ऊन सावली संगे
रमण्यात ही मौज म्हणुनी
मी हसून हल्ली माझ्या
जगण्याला श्रावण म्हणतो….
– गुरू ठाकूर –
सध्याचा श्रावण:-
बाहेर जाईन म्हणण्याआधी
‘मास्क’ नेहमीचा आठवतो
अन मास्क घालून जाता
भरवसा मनाला येतो
या ‘लाॅकडाऊन’ संगे
‘रम’ण्यात ही मौज म्हणूनी
मी बसून हल्ली माझ्या
जगण्याला ‘डरो-ना’ म्हणतो
© श्री अमोल अनंत केळकर
नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९
सुस्वागतम् आणि अभिनंदन.
श्रावण सरीत विनोदाचे तुषार