सौ. विद्या पराडकर

? कवितेचा उत्सव ?

☆ प्रियकर श्रावण…. ☆ सौ. विद्या पराडकर ☆

काळया काळया ढगातून श्रावण हसतोय ग॑.

प्रियकर श्रावण वसुंधरेला म्हणतोय ग.

 

मी येता तू पुलकित प्रिये कामिनी

लावण्या रुपी अशी देखणी

हिरवा हिरवा चुडा लेवुनी

संजीवनाचे मळे फुलती ग

 

ओढे सरिता खळखळ वाहती

सागराला तर येते भरती

जणू लेकरे आपुली कवळिती

नव जीवनाचे चित्र रेखाटी ग

 

धो धो वाहत गिरीशिखरावरूनी धबाबे येती

पशु पक्षी आनंदात लहरती बागडती

चर अचरावर तुझी वात्सल्य प्रीती

ममतेचे संगीत तू गाते ग

 

मृद्गंध हा आसमंत पसरला

सुगंध युक्त सुमना॑नी बागा सजल्या

जणू प्राजक्ता ने तुझ्यावर अभिषेक केला

पिसारा फुलवून मयूर नाचू लागला ग

 

ऊन पावसाचा लपाछपी चा खेळ चालला

सप्तरंगाचा नभोम॑डपी गोफ विणीला

सजणे मी येताच गरबा रंगला

वाद्ये घेऊन वायू सजला ग

 

अशी रूपमती झालीस सुंदर

मीलन होता अपुले मनोहर

नाचे गाई मुरली मनोहर

विश्र्व कल्याणाचा  ध्यास धरु ग

 

©

सौ. विद्या पराडकर

पुणे.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments