? कवितेचा उत्सव ?

☆ पक्षी ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆ 

पंख वेगळे रंग वेगळे

या पक्ष्यांचे ढंग वेगळे

झेप चिऊची चिमणी चिमणी

गरुडाचे आभाळ वेगळे !

 

     पाझरणाऱ्या मेघासाठी

     सदैव चातक आसुसलेला

     परी प्राशण्या टिपुर चांदणे

     चकोर कोणी तहानलेला !

 

इंद्रधनूचे रंग पाखरां

पण एखादा कोकिळ शापित

दिव्य सुरांची करी साधना

दुःख आपुले काळे झाकित !

 

     हिरव्या रानी धो धो धारा

     थुइथुइ चाले मयूरनर्तन

     कुणा दिसावा रम्य पिसारा

     विरुप पदांचे कुणास दर्शन !

 

कुणी अंगणी टिपती दाणे

कुणास लाभे मोतीचारा

कुणा नभांगण कुणा पिंजरा

दैवगतीचा खेळच न्यारा !

 

     ज्या पक्ष्यांना नसती घरटी

     त्यांचे जगणे दुसरे मरणे

     कवेत घेई गगन तयांना

     रुजवी कंठी अभाळगाणे !

 

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_printPrint
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments