सौ. विद्या पराडकर
कवितेचा उत्सव
☆ शिक्षक दिन विशेष – सरस्वतीच्या आकाशातील तारा….☆ सौ. विद्या पराडकर ☆
(दिनविशेष: 5 सप्टेंबर -डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन् जन्मदिन – शिक्षक दिन)
सरस्वतीच्या आकाशातील
तू एक तारा
विद्यारूपी वीणेच्या
छेड तू तारा
बहूव्यासंगी ज्ञानगंगेचा
आहेस तू कुंभ
पण ज्ञानदान करतांना
धरू नकोस दंभ
हाती छिन्नी हातोडा धरूनी
जैसा शिल्पकार
तैसाच तू शिल्पकार
जिवंत मूर्तीला देई आकार
तव यशो मय जीवनाचा विद्यार्थी द्योतक
विश्वात कोरलेले शिल्प सुबक
तव अखंड अध्यापनाचा तोच प्रतीक
तोच खरा प्रतीक
© सौ. विद्या पराडकर
पुणे.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈