सौ. स्वाती रामचंद्र कोरे
कवितेचा उत्सव
☆ शिक्षक दिन विशेष – अभंग ….. गुरु माझा ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे ☆
(आज ५ सप्टेंबर शिक्षक दिन, जीवनाची उत्तम जडण घडण करणाऱ्या, शालेय पाठाबरोबरच संस्काराचे धडे देणाऱ्या, वेगवेगळ्या क्षेत्रात भेटलेल्या सर्वच शिक्षकांना, गुरूंना शब्द सुमनांची मानवंदना)
गुरुविण नाही।जगी मान पान
जगण्यास ज्ञान।गुरु देती
प्रेमळ वागणे।मधुर बोलणे
सर्वां मान देणे।सांगे गुरु
गुरु माय बाप।गुरु बंधू सखा
होय पाठीराखा। नेहमीच
परीक्षा ते घेती।अनुभव देती
हात न सोडती।कदापि च
संकट काळात।मदत करती
आधार ते देती।सदोदित
अंतरी विश्वास।जगण्याचा ध्यास
गुरु माझा श्वास।झाला असे
गुरु ऋणातून।नाही उतराई
गुरुच्याच ठायी।मन लागे
गुरु चरणांची।घडो सदा सेवा
आनंदाचा ठेवा।सदा लाभो
© सौ. स्वाती रामचंद्र कोरे
खानापूर,जिल्हा सांगली
मो.9096818972
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈