सौ. कल्पना मंगेश कुंभार
कवितेचा उत्सव
☆ रंगात रंगला श्रावण… ☆ सौ. कल्पना मंगेश कुंभार ☆
नभी दाटून आले मेघ
बरसल्या श्रावण धारा..
मनही झाले चिंब चिंब
बेधुंद करी हा वारा..
थेंब थेंब पिऊन ही धरती
तृप्त होतसे क्षणोक्षणी..
मृदगंध दरवळे चहूकडे
इंद्रधनू उमटे मनोमनी..
रंगात रंगला श्रावण
किती हे आनंदाचे सण..
मोहरून जातसे माहेरी
त्या माहेरवाशिणीचे मन..
ऊन पावसाचा हा खेळ
निसर्गाचा अनुपम मेळ..
झाडे,वेली, प्राणी, पक्षी
सारेच आनंदी असा हा परिमळ..
© सौ. कल्पना मंगेश कुंभार
इचलकरंजी
मोबाईल नंबर:9822038378
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈