सौ.ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

☆ अद्वैत ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

सूर छेडिले मधुर

जशा सरीवर सरी

गोकुळाला वेड लावी

कान्हाची धुंद बासरी ||

 

वसे मोहन अधरी

हेवा वाटे गोपिकांना

भाग्य तुझे असे मोठे

याचे कारण सांगना ||

 

बासरीची ती साधना

कधी कुणा ना कळते

सर्वसंग परित्यागे

नतमस्तक ती होते ||

 

अहंकार त्यजुनीया

झाली पोकळ आतूनी

षडरिपू दूर होती

सहा छिद्रांच्या मधूनी ||

 

‘मी’पण नसे तियेला

शांत सदैव रहाते

फुंकर घालीता कान्हा

शीळ मधुर वाजते ||

 

परिपूर्ण या गुणांनी

चीज अनोखी बासरी

मुरलीधराला प्रिय

धरी सदैव अधरी ||

 

कान्हाच्या स्वरसंगमी

सारे विश्व वेडे होते

कृष्ण बासरीचे ऐसे

अद्वैत घडून येते ||

 

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
3 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments