? कवितेचा उत्सव ?

☆ प्रीतीच्या चांदराती…. ☆ श्री शांताराम नांदगावकर ☆ 

 

प्रीतीच्या चांदराती घेऊनी हात हाती

जोडू अमोल नाती, ये ना

ये प्रिये !

 

फुलला हा कुंज सारा,हसली पाने फुले

रुसवा आता कशाला,अधरी प्रीती फुले

हासते चांदणे !

 

सरला आता दुरावा,मिटती का लोचने

सखये या मीलनाला नुरले काही उणे

हात दे,साथ दे !

 

©  श्री शांताराम नांदगावकर

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments