☆ कवितेचा उत्सव ☆ कबर ☆ सुश्री निलांबरी शिर्के ☆
अंधारातच जगणे आता
नसेच येथे कसले वारे
कर्तृत्वाला खोल गाढुनी
अडसर लावुन बंद कवाडे
दाहिदिशातुन खुशाल वाहो
चैतंन्याचे कितीही वारे
संसाराच्या सारिपटावर
फासे पडले विपरीत सारेँ
नव्या दमाचे वाहो आता
प्रकाशात त्या कितीही वारे
अंधाराच्या गर्भामधूनी
विध्वंसाचे सदाच वारे
खोदत गेले मी जगताना
कबर खोलवर माझ्यासाठी
सारे हे करण्याकरता
मनास माझ्या धरले वेठी
© सुश्री निलांबरी शिर्के
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈