☆ कवितेचा उत्सव ☆ वंचना ? ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार ☆
राही एकनिष्ठ तू नको करू प्रतारणा |
नको करूस वंचना ||धृ||
निसर्ग हा सभोवती देतो तुज भरभरूनी |
तूच घेसी दुष्टासम त्यास ओरबाडुनी |
मीच श्रेष्ठ निसर्गाहुन नको करूस वल्गना ||
करू नकोस वंचना ||१||
कोण तू कोण मी एक बिंदू या जगी |
अफाट या ब्रह्मांडी श्रेष्ठता ही वाऊगी |
मातीतील कण मी एक ठेव मनी भावना ||
करू नकोस वंचना ||२||
जलसंयोजन हा उभा प्रश्न मानवापुढे |
गांभीर्या समजुनिया लक्ष देई त्याकडे |
आगामी पिढ्यांपुढे ठेव स्पष्ट योजना ||
करू नकोस वंचना ||३||
कोपला जर निसर्ग टेकशील हात तू |
रक्षिण्या ही संपदा दे इतरा साथ तू |
दृढ करूनी संकल्पा पूर्ण करी साधना ||
करू नकोस वंचना ||४||
© सुश्री प्रज्ञा मिरासदार
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈