सौ. विद्या वसंत पराडकर

? कवितेचा उत्सव ?

☆ ?।दीपावली।? ☆ सौ. विद्या वसंत पराडकर ☆

आनंदाच्या सौंदर्य लेण्यांनी

नटली सजली दीपावली

प्रतिकूलतेवर मात करूनी

विजयी झाली दीपावली ।१।

 

भ्रष्टाचारांच्या दुर्गुणांचा

नरकासूर मारून 

करुया अभ्यंग स्नान

मांगल्याने सजवू बघा दीपावली|२|

 

सद्गुणांचे दीप लावून

करु या लक्ष्मीपूजन

असमानतेचा अंधकार दूर सारून

समानतेच्या सुरेखा रंगांनी सजवू दीपावली।३।

 

बलीराजाच्या औदार्यांने

बलीप्रदा बघ आनंदली

भाऊ बहिणीच्या अतूट नात्याने                                                                

हासरी भाऊबीज , नाचली‌ दीपावली |४|

 

 स्वागताची रा॑गोळी

 पहा किती हर्षली

 र॑गीत दिव्यांनी घरे कशी शोभली

 मयूर‌ पंख लेवून आली‌ सखी

दीपावली |५|

 

 गोड ‌तिखटाचा संगम ‌झाल

जणू श्रीमंत गरीबांचा मेळ झाला 

करंजी ची चंद्रकोर सर्वांना भावली

समानतेची जणू आली दीपावली |६|

 

प्रकाशाचा सण हा भारी

अंधकार सारा‌ दूर करी

सत्यम् शिवम् ने कशी फुलली

तेजोमय ही आली दीपावली|७|

 

© सौ. विद्या वसंत पराडकर

पुणे.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments