प्रा. अशोक दास
कवितेचा उत्सव
☆ सण ☆ प्रा. अशोक दास ☆
सारीच घरे ऊजळलेली
प्रकाशाने लखलखलेली
तरीही एका झोपडीत अंधार
तो आपण करूया दूर/1/
सारेच चेहरे आनंदलेले
प्रसन्नतेने ओतप्रोत भरलेले
तरीही एखादे मुख दुर्मुखलेले
त्यावर पाहू हास्य फुललेले/2/
सा-यांच्याच मुखी गोड घास
सुगंधाने भारलेला श्वास निःश्वास
तरीही कुठेतरी घुसमट आहे
तिथेही गंध,गोडी वाटू हमखास/3/
दुःख,दैन्य असतेच कुठे कुठे
आनंदाने न्हाऊन निघताना तिथे
थोडी मदत देऊया त्या हाती
प्रसन्नतेने साजरा सण सर्वांसाठी/4/
© प्रा. अशोक दास
इचलकरंजी / मो 9028574666
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈