☆ कवितेचा उत्सव ☆ भय संपावे इथले ☆ श्री शरद कुलकर्णी ☆
युद्ध म्हणावे का
हा शुद्ध गनिमी कावा.
थैमान भयावह होता,
संहार कसा थांबावा?
अद्भुत कसा हा वैरी,
अदृश्य नी मायावी.
आगळीच शस्त्रे ज्याची ,
लक्षवेधी आणि प्रभावी.
फाटता आकाश अवघे,
ठिगळ कसे लावावे.
काळीज विदीर्ण होता,
कसे किती सावरावे.
एवढीच प्रार्थना माझी,
अवघा भोग सरावा.
भय संपावे इथले आणिक,
थोडा संयमही वाढावा.
© श्री शरद कुलकर्णी
२० .४ .२०२०
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
खुपच छान!!!
अतिशय सुंदर काव्य.