श्री सुहास रघुनाथ पंडित
कवितेचा उत्सव
☆ दीपावली शुभेच्छा ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
? नव वर्ष सुखाचे जावो ?
या दीपामधल्या वाती
अंधारा भेदून जाती
स्नेहाने जोडून नाती
प्रकाश गीते गाती.
तम सगळा विरून जावा
कण कण तो उजाळावा
दुःखाचा अंश नसावा
सौख्याचा बाग फुलावा.
दशदिशांत दिपक उजळो
कलहाचे वादळ निवळो
मन प्रसन्नतेने बहरो
नववर्ष सुखाचे जावो.
© श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈