☆ कवितेचा उत्सव ☆ ध्यास गझलेचा ☆ सौ.मनिषा रायजादे पाटील ☆
लागला हृदयास माझ्या ध्यास गझलेचा
छंद हा शब्दांस आता खास गझलेचा
हाय मज बेचैन केले या खयालांनी
रातदिन होतोय नुसता भास गझलेचा
स्वप्न तू की सत्य आता ना कळे मजला
सारखा होतोय मज आभास गझलेचा
पाकळ्या गंधाळल्या गंधाळली पाने
अंतरी मग बहरला मधु मास गझलेचा
साहवेना हा दुरावा आपल्या मधला
वाटतो आता हवा सहवास गझलेचा
धावुनी येशील नक्की तू साद ऐकूनी
पाहिजे आधार या हातास गझलेचा
रंगुनी रंगात गेले मी तुझ्या आता
तूच झाला सर्वथा मम श्वास गझलेचा
© सौ. मनीषा रायजादे-पाटील
सांगली
9503334279
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
????????