कवितेचा उत्सव
☆ तृप्त जीवन…. ☆ सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆
येणा ऱ्या अश्रुना थांबवायला हवे
वजाबाकी झालेल्या आयुष्यातले उरले भाग शोधायला हवे
मिळालेली आपली माणसे जपायला हवी
उदासीनता आणि मरगळ आता टाकायला हवी
उतरणीचा रस्ता सहजपणे उतरायला हवा
राग लोभाची शस्त्रे आता ठेवायला हवी
ढळत्या सूर्याची जाणीव ठेवायला हवी
चंद्राची शीतलता आता मनाला हवी
येणारी संध्याकाळ समाधानाने भरून घ्यायला हवी
देवघरातील समई सारखे
पावित्र अखेर मनी राहावे
आणि तृप्तपणे हळूच इथून निसटून जावे
© सुश्री स्नेहलता गाडगीळ
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈