प्रेमावर जगते जगणे
ओठावर फुलते हसणे
मी माझे माझे म्हणता
म्हणताना होते फसणे
डोळ्याच्या धारा ठरती
दु:खाला पाझर फुटणे
मन कातर कातर होता
वाट्याला येते हरणे
अपमानी वर्तन ठरते
क्रोधाला जागे करणे
सगळ्यांना दिसते कळते
मोलाचे नकली रडणे
हरल्यावर नक्की असते
वै-याच्या हाती पडणे
त्यागाची दुसरी बाजू
विरहाने नुसते झुरणे
चुकल्यावर खंत करावी
जगण्यावर कसले रुसणे?
© श्री तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈