कवितेचा उत्सव
☆ जिगिषा… ☆ सुश्री सुरेखा आपटे ☆
हातोडा होऊन घाव घातले आहेत
खिळा होऊन घाव सोसले आहेत
वास्तवाच्या भिंती तशाच राहिल्या
भगदाडं मनाला पडली आहेत.
कुणी शब्दांनं मारतं तर
कुणी शस्त्रानं
कोणी उपेक्षेने मारतं तर
कुणी गृहीत धरून.
एकाच उखळात सतरा घाव चुकवत
आयुष्य पडतं खर्ची.
कोणताच ठाव नसलेल्या त्यानं कसं जगावं स्वतः साठी?
सगळं संपलं तरी;
मातीत गाडलेलं बीज सुद्धा
अंकुरतं ,फुलारतं ,तरारून उठतं
त्यामागे काय असतं ?
फक्त जिगीषा
जगण्याची जिद्द अन् आशा
आणि “त्याची ‘इच्छा!
© सुश्री सुरेखा आपटे
पुणे
मो 9372494220
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈