☆ कवितेचा उत्सव ☆ सावित्री ☆ सौ.वंदना अशोक हुळबत्ते ☆
सत्यवानाला घेऊन
वडाखाली बसायला
वेळच नाही सावित्रीला
लाईट पाण्याच्या बीला बरोबर
किराणा आणायचा असतो तिला
घर ऑफिस सांभाळत
सांभाळते ती मूलांना
कर्तव्य बजावताना
विचार नसतो मनाचा
ढाली सारखी उभी असते
संसार ती करताना
किती दिवसात
नाही पाहिला आरसा
शृंगार तर दूर राहिला
तो कसा ही वागला
तो कसा ही असला
तरी
वड पुजावा लागतो तिला
त्याच्या आयुष्याचे दान
पदरी पाडावे लागते तिला
तिला नसतो चाॅईस
सावित्री बनता बनता
ती….सत्यवान तर..बनली नाही…. ना…?
© सौ.वंदना अशोक हुळबत्ते
मो.९६५७४९०८९२
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈