महंत कवी राज शास्त्री
साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 58
☆ गरिबी हा शाप … ☆
(भूक_अशी असते जी माणसाला काही पण करायला लावते,मढयावरील अथवा त्याला अर्पण केलेलं अन्न कधी कोणी खाल्लं तर त्यात नवल कसलं.शेवटी ती भूक आहे,आणि भूक माणसाला कुठे घेऊन जाईल याचा भरवसा नाहीच.)
मज नाही तमा ती कसली
भूक छळते फक्त मजला
तीच भूक शमविण्यासाठी
प्रवास माझा इथे थांबला
अन्न हवे शरीराला
अन्नमय प्राण आहे
अन्न नसेल तर मग
जीवन ज्योत मालवू पाहे
गरिबी हा शाप लागला
पिच्छा त्याने न सोडला
ह्याच शापास्ताव मग पहा
आलो मी रौद्र भूमीला…
© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.
श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005
मोबाईल ~9405403117, ~8390345500
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈