☆ कवितेचा उत्सव : मनोगत नवविवाहितेचे – श्री अनंत गाडगीळ ☆
माहेरच्या बागेत
जाई जुई फुलतात
सुगंधाने दरवळून
आसमंत भरतात
सासरच्या बागेत
मोगरा अन् गुलाब
गंधाळून वार्याचाही
वाढवितात आब
सासरच्या बागेत मला
माहेरची आठवण येते
माहेरच्या बागेत मला
सासर माझे खुणावते.
© श्री अनंत गाडगीळ
सुस्वागतम् आणि अभिनंदन.
अच्छी रचना