प्रा. सौ. सुमती पवार
कवितेचा उत्सव
☆ सोडवतो कोडे …. ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆
कुठे धावावे पळावे कुठे थांबावे कळेना
सुज्ञ माणसास पहा जीवनच आकळेना …
दोन पाऊले हो मागे दोन पाऊले ती पुढे
जगण्याची खिडकी ती आपसुकच उघडे…
नको धावाधाव,हवा शांतभाव रोज मनी
वेळ आपल्या हातात जाऊ देऊ नये सुनी
क्षणक्षण वापरावा होते चिज आयुष्याचे
हाव नकोच मनात सुत्र आहे गणिताचे….
झोळी आपुली केवढी आहे किती ती औकात
मूठ झाकली ठेवावी नका उघडू चौकात
क्षणाक्षणावर पहा नाव आपले कोरावे
कोणी येताच आडवा त्याला माफच करावे…
योग्य वेळी ती माघार सुज्ञ पणाचे लक्षण
नाही होत अपमान जाणतात सारे जण
पाठी मागून म्हणती याला जीवन कळले
हटवादी माणसाचे जेव्हा नशिब जळले….
हटवाद्याचे ना भले,सदा राहतो भिकारी
षड्रिपूंचेच घर आणि असतो विकारी
जगी सुज्ञ तोच जाणाअसे शांत नि संयमी
पडतच नाही त्याला मग कशाची ही कमी …
सारे धिराने करावे विचारानेच वागावे
भगवंत असे पाठी नाही लागत मागावे
दाना साठी मात्र हात ,सदा असू द्यावा पुढे
भगवंतच साक्षात मग सोडवतो कोडे ….
© प्रा.सौ.सुमती पवार
नाशिक
(९७६३६०५६४२)
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
Wow sir
Thanks a lot
????
??????????