कवितेचा उत्सव
☆ जीवनाची वाट वेडी…☆ कै. गंगाधर महांबरे ☆
जीवनाची वाट वेडी, ती कधी ना संपते!
थांबतो थोडा प्रवासी, वाट कुठली थांबते ?
आसवांसाठीच डोळे, पापण्यांचे रांजण
हुंदक्यांचा हक्क येथे, हासण्यावरी बंधन
एकटे बिन-चेह-याचे दैव केवळ हासते
भोवताली दिसती जे जे ते सुखाचे सोबती
जीवनी कोणी न साथी, कोण धावे संकटी ?
मरण घेऊन रूप गोंडस जगून पुन्हा पाहते.
कै. गंगाधर महांबरे
कोल्हापूर
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
सुंदर गीत आहे.
विनम्र अभिवादन ??