श्रीमती मीनाक्षी सरदेसाई
कवितेचा उत्सव
☆ झाडं म्हणजे!! ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆
————झाडं म्हणजे!!————
———-झाडं हसतात फुलांतून——–
झाडं झुरतात मुळांतून
सळसळतात, कुजबुजतात
कधी कधी पानं गाळतात ।
झाडं सुद्धा माणसांसारखी
कोणी उंच, कोणी बुटकी
कोणी लठ्ठ कोणी रोडकी
साधी, भोळी किंवा पक्की
एखादं खादाड असतं
मुलांसारखा करतं हट्ट
डोळे मिटून रुसून बसतं
किंवा दवातून रडतं ।।
मात्र झाडं नसतात पापी
म्हणुनच होत नाहीत दुःखी
निसर्गावर मातत नाही
तो पण त्यांच्यावर कोपत नाही।।
झाडांपासून शिकावं
फुलांसारखं हसावं
त्यांचा खरा धर्म एक
झाडांसारखं व्हावं नेक।।।
© श्रीमती मीनाक्षी सरदेसाई
सांगली
मो. – 8806955070, 9561582372.
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈