सौ. सुचित्रा पवार

? कवितेचा उत्सव ?

☆ दत्ता अवधूता…. ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

श्रीपाद वल्लभा। दत्ता अवधूता

सद्गुरूनाथा । नमन घे

        

उभी कृष्णातिरी । त्रैमूर्ती प्रसन्न

तेजस्वी चैतन्य । दिगंबर

 

चरणी खडावा । रुद्राक्षाच्या माळा

दयाळा कृपाळा । दीनानाथ      

 

अनुसया सत्त्वे । जन्म घेतलासी

तू अवतारीसी ।गुरुदेव

 

योगीयांचा योगी । ज्ञानाची माऊली

कृपेची सावली ।साक्षात्कारी

 

चिंता मुक्त करी । सन्मार्गासी नेसी

पावन करीशी । कृपाळुवा

 

प्रेमळ कटाक्षे । स्नेह पाझरती

तू भक्तांवरती । दयाघना

 

वेड लावी चित्ता ।भरती प्रेमाची

तुला हृदयाची । पायघडी

 

नित्य नाम घेता ।होय चिंता मुक्त

संकटा त्वरित । निवारीशी

 

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments