डाॕ संगीता गोडबोले
कवितेचा उत्सव
?? भारतमातेची आरती.. ?? डाॕ संगीता गोडबोले ☆
जय देवी जय देवी जय भारतमाता
नतमस्तक तुज चरणी गाऊ तव गाथा
हिमालयासम गिरिवर रक्षण तव करिती
स्वर्गही त्यागुन उतरे नंदनवन भूवरती
गंगा सिंधु कावेरीसह कितिक ते जलधी
वर्षा ग्रीष्मादि ऋतू तुझीच समृद्धी
विविध तरुलता कथती सुरस तव कथा
जय देवी जय देवी जय भारतमाता
त्यागमूर्त जणु भगवा तव हाती साजे
यशगाथा पुत्रांची विश्वभरी गाजे
भाषा अठरा षट् शास्त्रे अन् पुराणेही अठरा
जगती विज्ञानाच्या ..तू लखलखता तारा
जयतु जन्मभू गर्जे हृदय मम सदा
जय देवी जय देवी जय भारतमाता
© डाॕ संगीता गोडबोले
कल्याण .
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈