कवितेचा उत्सव
☆ लक्ष्मण रेषा ☆ कवयित्री पद्मा गोळे ☆
सीतेपुढे एकच ओढली रेषा
लक्ष्मणाने
तिने ती ओलांडली
आणि झाले
रामायण
आमच्या पुढे दाही दिशा
लक्ष्मंणरेषा
ओढाव्याच लागतात
रावणांना सामोरे जावेच लागते
एवढेच कमी असते
कुशीत घेत नाही
भुई दुभंगून.
कवयित्री पद्मा गोळे
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈