महंत कवी राज शास्त्री
साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 69
☆ शृंगारिक… ☆
सखे अवखळ तू, अल्लड मोहक तू
तुझी काया प्रिये, वसंताचा बहार तू
सुरेख तुझी कांती, सुरेख तुझा बांधा
तुला पाहुनी मग, मला झाला प्रेमबाधा
तुझे केस रेशमी, त्यात तो गजरा
गजरा खुणावतो, ये जरा सामोरा
गुलाबी तुझे ओठ, जसे डाळिंब पिकले
पिकून डाळिंब, आपोआप जसे फुटले
गोबरे गोबरे गाल, नाजूक त्यावर खळी
स्मित तुझे हास्य, गेला माझा बळी
गोरे गोरे नाजूक पाय, मंद मंद त्याची चाल
ठुमकत आली जेव्हा, मिठी मारावी खुशाल
एक आणले पैंजण, तुझ्याच सारखे मस्त
पैंजण बांधताना पायात, लाजली तू जास्त
अशी तू मंदाकिनी, तारुण्यात मुक्त बहरली
तुझ्यात अलवार माझी, प्रीती बहू जडली
© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.
श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005
मोबाईल ~9405403117, ~8390345500
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈