सौ.ज्योत्स्ना तानवडे
कवितेचा उत्सव
☆ हुकुमत वेळेची ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆
जन्म मृत्यूची वेळ
असते विधात्याच्या हाती
प्रत्येक गोष्टीची एक वेळ
ठरवत असते नियती ||
काळवेळेचे भान ठेवत
वेळ पाळत जावे
वेळेआधी अन वेळेनंतर
काही मिळत नाही हे उमजावे ||
वेळ फार महत्वाची
क्षणक्षण मोलाचा असतो
अचानकपणे एक क्षण
आयुष्याला कलाटणी देतो ||
गेलेली वेळ कधीच
परतून पुन्हा येत नाही
आयुष्याचा नियम मोलाचा
वेळे इतके काही मौल्यवान नाही ||
वेळ हसवते वेळ रडवते
वेळेमुळे दु:खाला विसर पडतो
प्रत्येक जण कुणीही असो
वेळेचा मात्र गुलाम असतो ||
© सौ.ज्योत्स्ना तानवडे
वारजे, पुणे.५८
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈